Mumbai Rain Alert 19 August-आज, 19 ऑगस्ट 2025 ला मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आता पर्यंत मुंबईत सातत्याने जोरदार पाऊस सुरू असून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या सेवा वगळता इतर कार्यालये बंद राहतील.
मुंबई आणि उपनगरांमध्ये लोकल ट्रेन सेवा उशिराने चालू असून, काही ठिकाणी पाणी साचले आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, आणि आवश्यक असल्यासच प्रवास करावा, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.
विद्यार्थ्यांसाठी आजच्या दिवशी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत.
सावधगिरी बाळगा, आवश्यक ती खबरदारी घ्या!
HPCL Fixed Term Project Associate Jobs apply
स्रोत: महानगरपालिका